
नांदगाव (.प्रतिनिधी ) – मविप्र संचलित आदर्श प्राथमिक शाळा, नांदगाव..*यामध्ये संत सावता महाराज पुण्यतिथी व *लोकमान्य टिळक* यांची जयंती साजरी करण्यात आली. *मुख्याध्यापक श्री साळुंके सर* व श्री जाधव सर श्री महाले सर श्री शिरसाठ सर श्री कदम सर श्री सोळुंके सर श्री रायते सर व श्रीमती शिंदे मॅडम व श्रीमती कदम मॅडम व श्रीमती पाटील मॅडम यांनी प्रतिमा पूजन केले. श्री जाधव सर.. यांनी आपल्या मनोगतून संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते, ज्यांनी आपल्या भक्ती आणि कर्माने समाजाला एक नवा आदर्श घालून दिला. ‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठ्ठलमाझी’ या त्यांच्या अभंगातून त्यांनी शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न मानता, ईश्वरसेवेचे माध्यम मानले. त्यांनी शिकवले की कोणतेही काम कमी नसते, जर ते निष्ठेने आणि भक्तीने केले तर तेच ईश्वरप्राप्तीचा मार्ग बनू शकते. त्यांचे जीवन हे कर्मयोग आणि भक्तीयोगाचा संगम होते. त्यांनी समाजाला श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. कोणतीही व्यक्ती आपल्या व्यवसायामुळे किंवा जातीमुळे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, हे त्यांनी सांगितले. *मुख्याध्यापक श्री अविनाश साळुंके सर..यांनी संत सावता महाराजांची भक्ती ही केवळ देवाचे नामस्मरण करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती त्यांच्या कर्मयोगातून प्रकट झाली. ते आपल्या शेतीत राबत असतानाही विठ्ठलाचे नामस्मरण करायचे. खरी भक्ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील कर्तव्यातूनच ईश्वराशी एकरूप होणे होय. त्यांची भक्ती ही अंधश्रद्धा किंवा कर्मकांडात अडकलेली नव्हती, तर ती अत्यंत साधी आणि निष्ठावान होती हे सांगितले. श्री शिरसाट सर यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांचा कार्याचा परिचय केला . ‘वृक्ष हीच खरी संपत्ती आहे’ हे वन संवर्धन दिनानिमित्त सांगितलं. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कदम मॅडम यांनी केले…
