
नांदगाव (प्रतिनिधी)- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयामध्ये संत सावता महाराज पुण्यतिथी व लोकमान्य टिळक , चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका ज्योती काळे , पर्यवेक्षक अविनाश शेवाळे ,जेष्ठ शिक्षक जगन्नाथ पाटील ,उमेश पगार ,अशोक मार्कंड, विजय देशमुख, अण्णासाहेब दुकळे ,भाऊसाहेब सोनवणे, बाळासाहेब कवडे, राजेंद्र कदम, दत्तात्रेय भिलोरे, गजेंद्र माताडे, संदेश थोरात, सुनील सुपेकर , भाऊसाहेब रायते ,प्रनोद गोटे,नरेंद्र पाटील, शरद सातपुते, श्री गणेश ढोणे कपिल पवार,सुनिता निकम ,सुवर्ण अहिरे, स्मिता केदारे, सरला बिडवे,गवळी जया , वैशाली पाटील,सायली पाटील, कल्पना आहिरे श्रीमती खैरनार ,श्रीमती राणे यांनी प्रतिमा पूजन केले. समाधान गोटे यांनी आपल्या मनोगतून संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते, ज्यांनी आपल्या भक्ती आणि कर्माने समाजाला एक नवा आदर्श घालून दिला. ‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठ्ठलमाझी’ या त्यांच्या अभंगातून त्यांनी शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न मानता, ईश्वरसेवेचे माध्यम मानले. त्यांनी शिकवले की कोणतेही काम कमी नसते, जर ते निष्ठेने आणि भक्तीने केले तर तेच ईश्वरप्राप्तीचा मार्ग बनू शकते. त्यांचे जीवन हे कर्मयोग आणि भक्तीयोगाचा संगम होते. त्यांनी समाजाला श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. कोणतीही व्यक्ती आपल्या व्यवसायामुळे किंवा जातीमुळे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, हे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी संत सावता महाराजांची भक्ती ही केवळ देवाचे नामस्मरण करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती त्यांच्या कर्मयोगातून प्रकट झाली. ते आपल्या शेतीत राबत असतानाही विठ्ठलाचे नामस्मरण करायचे. खरी भक्ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील कर्तव्यातूनच ईश्वराशी एकरूप होणे होय. त्यांची भक्ती ही अंधश्रद्धा किंवा कर्मकांडात अडकलेली नव्हती, तर ती अत्यंत साधी आणि निष्ठावान होती हे सांगितले. पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांचा कार्याचा परिचय केला . ‘वृक्ष हीच खरी संपत्ती आहे’ हे वन संवर्धन दिनानिमित्त सांगितलं. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली मोरे यांनी केले.
