
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७५ वा दिवस* भारताबद्दल अतिशय प्रीती, देशभक्ती व आपल्या पूर्वजांविषयी पूर्ण आदर बाळगून मला असे वाटते की, आपल्याला इतर देशांकडून पुष्कळ गोष्टी शिकायच्या आहेत. आपण आपल्या देशाबाहेर गेलो नाही, आपल्या देशातील परिस्थिती व अन्य देशांतील परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास केला नाही, हेच भारतीय मनाच्या अधोगतीचे एक मोठे कारण आहे. आपण त्याबद्दल प्रायचित्त एक हजार वर्षांचा गुलामगिरीच्या रुपाने भोगले आहे; यापुढे आपण पुनः असे करण्याचे टाळू या.
*स्वामी विवेकानंद…* *
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १ श्रावण शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २३ जुलै २०२५
★ १८५६ भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी नेते, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, समाजसुधारक, पत्रकार भगवद् गीतेचे भाष्यकार (गीतारहस्य) लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक यांचा जन्मदिन.
★ १९०६ क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन.
★ आंतरराष्ट्रीय विधवा दिन.
★ संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
