
14ऑक्टोबर 2024 नुसार वाढीव टप्पा अनुदानाची मागणी दिनांक 18 जुलै 2025 रोजी विधान भवनात राज्याचे शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांनी जाहीर केले यांच्या घोषणेनंतर सुमारे राज्यातील 60000 शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले .. म्हणून राज्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे यांच्या इच्छेनुसार नाशिक जिल्ह्यातील कृती समितीचे व समन्वय समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 20 जुलै रोजी मालेगाव येथे मंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला व माननीय मंत्री महोदय यांच्या निदर्शनास एका निवेदनाद्वारे असे आणून दिले की फेब्रुवारी 2021 मध्ये ज्या शाळा २० टक्के वाढीव टप्प्याला अपात्र होत्या परंतु एक महिन्याच्या मुदतीत त्यांनी त्रुटी पूर्तता केलेली होती अशा सर्व शाळांना देखील 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा पूर्ववत पद्धतीने करून द्यावा अशी विनंती साहेबांना करण्यात आली व साहेबांनी देखील तसे 14 ऑक्टोबर 24 चा शासन निर्णय नुसार अनुदान दिले जाईल असे स्पष्ट शब्दात सांगितले यावेळी ही भेट घडवून आणण्यासाठी समन्वय समितीचे श्री अनिल निकम, श्री अरुण पवार व कृती समितीचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, जिल्हा अध्यक्ष भारत भामरे उपाध्यक्ष शरदचंद्र काकुस्ते संस्थाचालक महामंडळाचे राज्य सचिव श्री अमोल पाटील , सुभाष पवार ,संजय बच्छाव ,कन्हैया पगार महेंद्र पवार ,शरद शेलार ,ठोके सर, गुंजाळ सर दशरथ जाधव विकास पगार, जगताप सर, पवार सर ,जयेश पवार, क्षीरसागर सर आदी शिक्षक उपस्थित होते…
