
पिंपळगाव बसवंत*| मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयपिंपळगाव बसवंत येथे कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते गुरू-शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री संजय डेर्ले हे होते.व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थी मनोगत प्रणव मोरे व श्रेया बनकर यांनी केले.शिक्षक मनोगतातून श्री जगदीश कुशारे यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे शैक्षणिक कृषी विषयक कार्य सांगितले.अध्यक्षीय मनोगतातून संजय डेर्ले यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ काकासाहेबांची देहयष्टी सहा फूट उंच होती. भरदार छाती व आवाजात जरब असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कमालीचे प्रभावशाली होते. आवाज पहाडी होता. बहुजन समाजावर अन्याय दूर करण्यासाठी शासनावर आणि शोषणकर्त्यांवर कर्मवीर काका आपल्या निर्भीड कर्तृत्वाची आणि पहाडी आवाजाची तोफ डागत असत. इगतपुरी येथील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मोठे आंदोलन उभारले. शोषितांच्या बाजूने उभे राहताना काकांनी पक्ष शिस्तीची, स्वतःच्या स्वाभिमानाची अथवा प्रतिष्ठेची कधीही पर्वा केली नाही. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जडनघडणीत कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे योगदान अतुलनीय राहिले आहे .राजकीय पुढाऱ्यांच्या रागलोभाची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. जनतेचे प्रश्न पक्षाकडून सुटत नसतील, तुम्हाला न भिता बोलायची मुभा नसेल तर तो पक्ष काय कामाचा, असे त्यांचे रोखठोक मत होते.सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांनी केलेले कृषी व सहकार तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्य सांगितले . फलक लेखन कलाशिक्षक अनिल शिरसाठ यांनी केले.सुत्रसंचलन आर्या शिंदे व सुकृती ताकाटे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
