
लेखक – तानाजी धरणे 9975370912
ग्रामीण जीवनाच्या भावस्पर्शावर उमटलेल्या हृदयस्पर्शी कथा . उद्ध्वस्त ‘ हा लघुकथासंग्रह म्हणजे ग्रामीण भागातील जीवन शैलीचा आरसा असुन विविध जीवनशैलीचा व संस्कृतीचा एक जीवंत पट आहे . लेखक प्रा . पंढरी बनसोडे हे ग्रामीण कथालेखक असुन या लघुकथासंग्रहात त्यांनी एकुण २० कथांची गुंफन केली आहे . या सर्व लघु कथा असल्या तरी त्यातुन प्रकट होणारे भाव व भावार्थ खुप मोठा अर्थ सांगुन वाचकाला तृप्त करतात . या कथामधुन माणवी जीवनाचे , वस्तुंचे प्राण्यांचे व दैनंदिन व्यवहाराचे अतुट नाते प्रकर्षाने जानवते . प्रा .पंढरी बनसोडे हे गरीब व बहुजन वर्गातुन आल्यानं त्यांच्या लेखनिला साहित्याला ग्रामीण दलित व कष्टकरी, शोषितांच्या वेदनेची झालर आहे . त्यामुळे त्यांचे साहित्य वाचकाला आपले वाटते व एक मोठा वाचकवर्ग त्यांनी अल्पावधित निर्माण केला आहे ही त्यांची लेखनाची जमेची बाजु आहे असे वाटते . त्यांचे यापुर्वी १) तु घे भरारी २) शब्द फुले ३) भारताचा पाया ४) टाहो हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत तर ५) आक्रोश हा लघुकथासंग्रह प्रकाशित झालेला आहे . त्यांच्या साहित्याला अनेक नामवंत संस्थांनी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .’ उद्धवस्त ‘ हा लघुकथासंग्रह हे त्यांचे सहावे पुस्तक आहे .मराठी साहित्याच्या प्रांगणात कथेला अनन्यसाधारण स्थान आहे .त्यातही छोट्या कथांच्या माध्यमातुन लेखक मानवी जीवनाच्या भाव-भावनांचा मेळ गुंफून त्या कथास्वरुपात वाचकांसमोर आणत असतो . म्हणुन कथासंग्रह हे समाजमाध्यमावर लवकर परिणाम करणारा एक चांगला साहित्यप्रकार मराठी साहित्यात रुजला आहे . कथेमध्ये घटना प्रसंग ,व्यक्तीचिञण आणि निवेदन या सर्व बाबी असतात ,मराठीमध्ये कथा या वाड् :मय प्रकाराचे एक आगळेवेळले स्थान आहे .त्यातही साठोत्तरी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्य चळवळीचा प्रवाह अत्यंत महत्वाचा मानला जातो .प्राचार्य रा.र. बोराडे,डाॅ .नागनाथ कोत्तापल्ले, आनंद यादव,व्यंकठेश माडगुळकर , शंकर पाटील , दत्ताराम मानुगडे अशा लेखकांनी ग्रामीण माणसाच्या भावभावनांना शब्दरुप दिले . या साहित्यिकांनी ग्रामीण साहित्याला एका मोठ्या उंचीवरती नेले . ग्रामीण साहित्याची चळवळ या अशा मोठ्या लेखकांनी वृद्धींगत करण्याचे मोठे काम केले आहे . याच धर्तीवर आमचे साहित्यिक मिञ असलेले प्राध्यापक पंढरी बनसोडे हे आपल्या लघुकथांमधुन सातत्यानं वाचकासमोर येत आहेत . त्यांचा हा लघुकथा लेखनाचा प्रकार वाचकांना भावत असुन त्याला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद भेटत आहे . ही बाब एक लेखक म्हणुन मलाही सुखावणारी आहे . मराठी साहित्याला फार मोठी परंपरा आहे . पहिल्या पिढीतील ग्रामीण साहित्यिकांनी आपल्या कालखंडात ग्रामीण माणसाच्या कष्टकर्याच्या वंचितांच्या भावणांना , प्रश्नांना आपल्या प्रभावी लेखणीतून वाचा फोडली . त्यांनी ग्रामीण माणुस आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी मांडून त्याच्या भावभावना , नातेसंबंध, निसर्गाशी असलेले त्याचे सबंध आपल्या भागातील राजकारण , समाजकारण , जातीयता,लिंग भेदभाव अशा विविध समस्यांना आपल्या साहित्याचा आशय केला होता .म्हणुन ते ग्रामीण साहित्य सामान्य वाचकांना आपले वाटले . कोणत्याही कलाकृतीतुन लेखक जेंव्हा सामान्य माणसाचं जगणं , त्याचे कष्ट , त्याला दैनंदिन जीवन जगताना भोगाव्या लागणार्या वेथा आपल्या लेखणीतुन उतरवतो तेंव्हा ती साहित्यकृती त्या लेखकाची राहत नाही ती सर्वसामान्याची होते . व जनमाणसाची ती जगण्याची रीत होते तेंव्हा ती साहित्यकृती एक ‘मैलाचा दगड ‘ होते समाजमान्य होते . याच धरतीवर लेखक प्रा . पंढरी बनसोडे सरांचे लेखनकार्य चालु असुन त्यांचा ‘ उद्ध्वस्त ‘ हा लघुकथासंग्रह वाचकाच्या मनाचा ठाव घेईल व मराठी साहित्यात नावलौकिक करील असे वाटते . त्यांच्या ‘ उद्ध्वस्त ‘ या लघुकथासंग्रहाला व त्यांच्या पुढील लेखन कार्यास माझ्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा …..!!!
हेलपाटाकार – लेखक – तानाजी धरणे 9975370912
