
लासलगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात IQAC व NEP Implementation Cell यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जुलै 2025 रोजी प्रथम वर्ष B.Com आणि B.Com (CA) या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी भूषवले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक प्राविण्य नव्हे, तर एक चांगला माणूस बनण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे आणि प्रा.उषा आहिरे उपस्थित होते. प्रा.भूषण हिरे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त व नीतीमत्तेचे महत्त्व पटवून दिले, तर डॉ.सोमनाथ आरोटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले.प्रा.विरेंद्र आहेर यांनी B.Com अभ्यासक्रमाशी संबंधित नवीन शैक्षणिक धोरण (NEP) समजावून सांगितले. प्रा.योगेश पवार यांनी B.Com (CA) च्या विद्यार्थ्यांसाठी NEP अंतर्गत संधी आणि अभ्यासक्रम रचना स्पष्ट केली. प्रा.सृष्टी थोरात यांनी विद्यार्थ्यांना Academic Bank of Credits (ABC ID) च्या नोंदणी प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सृष्टी थोरात यांनी केले, तर डॉ.मनोहर मोरे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
