
नांदगाव – मविप्र संचलित आदर्श प्राथमिक शाळा, नांदगाव येथे आज रोजी कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांची गुरु शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली माननीय संचालक श्री अमित भाऊ बोरसे पाटील साहेब व मुख्याध्यापक. श्री साळुंके सर व स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री राजाराम गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रदीप शिरसाट सर यांनी आपल्या मनोगतातून . गुरु – कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. बहुजनांच्या मुलांकरता शिक्षणाची गंगोत्री यांनी खेड्या- पाड्यांमध्ये पोहोचवली.

शिष्य – सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या विषयी बोलताना शिक्षण, शेती व कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा कार्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सामाजिक काम केले कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांची गुरु- शिष्य जोडी जिल्ह्यात आदर्श व्रत जोडी आहे. गुरु शिष्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा या संयुक्त पुण्यतिथी साजरी करण्याचा उद्देश आहे हे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री. संजय जाधव सर यांनी केले…
