
नाशिक (प्रतिनिधी ) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये पंडित कमलानंद शास्त्री स्मृतिदिन _संस्कृत दिनी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांनी विद्यार्थिनीना संस्कृत भाषेबद्दल महत्त्व व पुढील शिक्षणातील संधी या बद्दल मार्गदर्शन केले. पं.कमलानंद शास्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते.दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक येथे पंडित कमलानंद शास्त्री स्मृतिदिन_ संस्कृतदिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे बुवा यांनी आपल्या रसाळ वाणीतून ताल,लयाच्या गुरुमंत्राने सुरुवात करुन आधुनिकतेकडे जातांना संस्कृत भाषा किती शास्त्रशुद्ध आहे हे सांगीतले. संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये उदा.सहित कथन केली.ही भाषा सर्व भाषांमध्ये सर्वश्रेष्ठ कशी आहे यांचे महत्त्व त्यांनी सांगितले.पुढे त्यांनी वेद,उपनिषदे, भगवद्गीता हे भारतीय संस्कृतीचे मानदंड आहेत.ते समजून घ्या.या भाषेने आपले आचरण शुद्ध होते.म्हणून प्रत्येकाला संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थोरवी कळली पाहिजे.तसेच या भाषेचा योग्य आदर,प्रसार सर्वाकडून होत राहो हीच अपेक्षा..

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतांतून बोलतांना शालेय समितीचे चेअरमन रमेश महाशब्दे यांनी संस्कृतचा अभ्यास सर्वांनी करावा आणि असेच उपक्रम चालू राहो,अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.यावेळी वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी संस्कृतदिनी सर्वाचे स्वागत प्रास्ताविकामधून पं.कमलानंद शास्त्री यांच्या कार्याची माहिती सांगितली.संस्थेच्या गव्हर्निग कौन्सिल सदस्या अमृता कवीश्वर यांनी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांचा परिचय करून दिला तसेच त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ह.भ.प.श्री चारुदत्त आफळे बुवा यांच्या हस्ते इ.१०वीच्या बोर्डाच्या परीक्षेत संस्कृत विषयात ९०पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थेच्या सर्व शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनीना रोख रक्कम देऊन आणि इ.४थी,इ.८वी व इ.९ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनाही संस्कृत पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.पारितोषिकांची यादी वाचन भावना शिंदे यांनी केले.तसेच श्री डी.डी.बिटको बाँईज हायस्कूल व वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून दिले. ग.कौ.सदस्या भारती चंद्रात्रे व ऋतुजा नाशिककर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. ग.कौ.सदस्या भारती चंद्रात्रे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर आभार गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल यांनी केल

कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन,उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी,सेक्रेटरी हेमंत बरकले,शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे,शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे,अधिक्षिका मीना वाळूंजे व वासंती पेठे,श्री भास्कर कवीश्वर,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व मिलिंद कोठावदे,पर्यवेक्षिका सुषमा गवारे ग.कौ. सदस्य कैलास बागुल,भारती चंद्रात्रे,संस्थेचे सर्व सदस्य,सर्व शालेय पदाधिकारी,सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिंनी व पालक उपस्थित होते.
