
नाशिक:-( प्रतिनिधी )पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित आणि साहित्यिक विवेक उगलमुगले संपादित ‘अक्षर’मोती पेरताना… (कवी रवींद्र मालुंजकर यांच्या ‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहावरील आस्वादक प्रतिसाद)चे प्रकाशन रविवार दि.१४ जून रोजी सायंकाळी ६ वा. सावानाच्या मु.शं.औरंगाबादकर सभागृहात होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्र.द.कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सोहळ्यात सुप्रसिद्ध समीक्षक प्रा.सुनील हिंगणे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, महानुभाव पंथाचे व्यासंगी अभ्यासक प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर, मखमलाबादच्या ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळाचे अध्यक्ष विनायक सूर्यवंशी, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, मसाप नाशिकरोड शाखेचे कार्यकारिणी सदस्य आणि सुप्रसिद्ध गीतकार मिलिंद गांधी, प्रकाशक विलास पोतदार या मान्यवरांसह ‘आठवांचे लक्ष मोती’कार कवी रवींद्र मालुंजकर आणि जया मालुंजकर हेही उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संपादक विवेक उगलमुगले, वैशाली प्रकाशन आणि गिरणा गौरव प्रतिष्ठान यांनी केले आहे.
