
*नाशिक*| मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते गुर-शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे हे होते.व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थी मनोगत प्रांजल गांगुर्डे हिने केले.शिक्षक मनोगतातून सुषमा गिते यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे शैक्षणिक कार्य सांगितले.अध्यक्षीय मनोगतातून ज्ञानेश्वर शिंदे यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ काकासाहेबांची देहयष्टी सहा फूट उंच होती. भरदार छाती व आवाजात जरब असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कमालीचे प्रभावशाली होते. आवाज पहाडी होता. बहुजन समाजावरअन्याय दूर करण्यासाठी शासनावर आणि शोषणकर्त्यांवर कर्मवीर काका आपल्या निर्भीड कर्तृत्वाची आणि पहाडी आवाजाची तोफ डागत असत. शोषितांच्या बाजूने उभे राहताना काकांनी पक्ष शिस्तीची, स्वतःच्या स्वाभिमानाची अथवा प्रतिष्ठेची कधीही पर्वा केली नाही. राजकीय पुढाऱ्यांच्या रागलोभाची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. जनतेचे प्रश्न पक्षाकडून सुटत नसतील, तुम्हाला न भिता बोलायची मुभा नसेल तर तो पक्ष काय कामाचा, असे त्यांचे रोखठोक मत होते.सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांनी केलेले सामाजिक कार्य सांगितले.कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे फलक लेखन रुपाली शेडगे यांनी केले.सुत्रसंचलन आर्या थोरात व आभार स्वरा अमृतकर हिने मानले.
