
नांदगाव – मविप्र संचलित स्व शरद आण्णा आहेर जनता विद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांची गुरु शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. थेटे एस.जी.जेष्ठ शिक्षक श्री.कवडे एस.एस श्री.परदेशी सर यांनी गुरु शिष्य प्रतिमेचे पूजन केले. मा.मुख्याध्यापक यांनी गुरु – कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. बहुजनांच्या मुलांकरता शिक्षणाची गंगोत्री यांनी खेड्या- पाड्यांमध्ये पोहोचवली. शिष्य – सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या विषयी बोलताना शिक्षण, शेती व कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा कार्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सामाजिक काम केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम चव्हाण मॅडम यांनी केले.
