राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.श्री चारुदत्त आफळे बुवा यांचे विद्यार्थिनीना संस्कृत भाषेबद्दल महत्त्व व संस्कृत भाषेचे सौंदर्य यांचे दिले ज्ञानार्जनातून धडे.

भारतीय संस्कृती जागतिक स्तरावर मानवता पोहचविणारी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्त आफळे

दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत आज सोमवार दि.२१/०७/२०२५ रोजी पंडित कमलानंद शास्त्री स्मृतिदिन संस्कृत दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ. चारुदत्त आफळे बुवा यांच्या हस्ते पं.कमलानंद शास्त्री व सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून ईशपूजन करण्यात आले.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्त आफळे बुवा यांनी आपल्या रसाळ वाणीतून ताल,लयाच्या संगमातून गुरुमंत्राने सुरुवात करुन आधुनिकतेकडे जातांना व भाषेचे महत्त्व सांगतांना संस्कृत भाषा किती शास्त्रशुद्ध आहे,हे तुम्हीच तपासून पाहा.असे सांगून जी भाषा मुळात अचूक आहे,त्याच भाषेकडे वळले पाहिजे.इतर भाषेत वेगळे अर्थ निघतात पण संस्कृत भाषेतील अर्थ हा तोच अर्थ असतो.त्यातील गैरसमज दूर करा आणि ज्या भाषेत प्रगती आहे,त्याच भाषेकडे विद्यार्थ्यांनी वळावे,त्या भाषेचा अभिमान बाळगून संस्कृत मधील शब्दांचे आनंद घ्यावे.संस्कृत पेक्षा इतर भाषामध्ये अपूर्णता प्रचंड आहे,हे सांगतांना समस्यापूर्ती,अपशब्द व संस्कृत भाषेचे वैशिष्ट्ये उदा.कथन करुन ही भाषा सर्व भाषांमध्ये सर्वश्रेष्ठ कशी आहे यांचे महत्त्व त्यांनी सांगितले.पुढे त्यांनी वेद,उपनिषदे, भगवतगीता ही भारतीय संस्कृतीची मानदंड आहेत.ती समजून घ्या.आणि जागतिक स्तरावर मानवता पोहचविणारी अशी संस्कृत ही देवाची देववाणी भाषा आहे.या भाषेने आपले आचरण कसे शुद्ध होते.म्हणून प्रत्येकाला संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थोरवी कळली पाहिजे.तसेच या भाषेचा योग्य आदर,प्रसार सर्वाकडून होत राहो हीच अपेक्षा..

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतांतून बोलतांना शालेय समितीचे चेअरमन रमेश महाशब्दे यांनी संस्कृतचा अभ्यास सर्वांनी करुन संस्कृत भाषा गद्यापेक्षा पद्यात जास्त आहे.आणि संस्कृत भाषा संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.व या भाषेचे महत्त्व सांगून असेच उपक्रम चालू राहो,अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.यावेळी वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिंनिनी ईशस्तवन सादर केले.त्यांना ऋतुजा नाशिककर यांनी मार्गदर्शन केले.मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी संस्कृतदिनी सर्वाचे स्वागत करुन प्रास्ताविकामधून पं.कमलानंद शास्त्री यांच्या कार्याची माहिती सांगितली.संस्थेच्या गव्हर्निग कौन्सिल सदस्या अमृता कवीश्वर यांनी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा व कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलचे चेअरमन रमेश महाशब्दे यांचा परिचय करून दिले.तसेच त्यांचा यथोचित सत्कार शाल,श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला.त्यासबरोबर ह.भ.प.श्री चारुदत्त आफळे बुवा यांच्या हस्ते इ.१०वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९०पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थेच्या सर्व शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनीना रोख रक्कम देऊन आणि इ.४थी,इ.८वी व इ.९ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनाही संस्कृत नवग्रह स्त्रोत्रम,पाठांतर स्पर्धेतील संस्कृत विषयाला पूरक अशी पुस्तके बक्षिसे म्हणून देण्यात आली.बक्षिसे यादी वाचन भावना शिंदे यांनी केले.तसेच श्री डी.डी.बिटको बाँईज हायस्कूल व वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सांस्कृतिक कार्यक्रमातून नृत्ये,नाटिका,मम तापमपाकुरु देव…हे विष्णू स्तोत्र व सागरं सागरीयं नमामोवयम्… हे संस्कृत गीत इ.१०च्या विद्यार्थिनींनी सादर करुन संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून दिले.ऋतुजा नाशिककर यांनी हार्मोनियम वाजविले.त्यांना मार्गदर्शन गव्हर्निंग कौन्सिल सदस्या भारती चंद्रात्रे व ऋतुजा नाशिककर यांनी केले.संस्कृतमधून दैनंदिन व्यवहारातील विविध वस्तूचे माहिती व्हावी,म्हणून वस्तू प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सविता कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.भारती चंद्रात्रे यांच्या नियोजनातून त्यात सर्व शालेय पदाधिकारी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होऊन विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन गव्हर्निंग कौन्सिल सदस्या भारती चंद्रात्रे व आभार गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल यांनी केले.कु.अक्षरा गायकवाड,कु.भूमिका पाटील,कु.मानसी सोमवंशी यांनी ऐक्यमंत्राचे पठण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शेवटी प्रसाद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन,उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी,सेक्रेटरी हेमंत बरकले,शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे,शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे,अधिक्षिका मीना वाळूंजे व वासंती पेठे, जाईंट सेक्रेटरी भास्कर कवीश्वर,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व मिलिंद कोठावदे,पर्यवेक्षिका सुषमा गवारे गव्हर्निग कौन्सिल सदस्य कैलास बागुल,भारती चंद्रात्रे,संस्थेचे सर्व सदस्य,सर्व शालेय पदाधिकारी,सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिंनीनी व पालक उपस्थित होते.फलकलेखन सायली मुळे
