
नांदगाव ( प्रतिनिधी ) दैनिक सकाळ तर्फे ” गौरव भूमिपुत्राचा ” हा पुरस्कार दिनांक 20 जुलै 2025 रोजी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सरचिटणीस माननीय रमेश आप्पासाहेब पगार यांना नाशिक विभागातील मालेगाव येथे नुकताच प्रदान करण्यात आला, ग्रामीण भागात आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा, महिला महाविद्यालय व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देऊन मा. आप्पासाहेबांना गौरविण्यात आले, याबद्दल ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नांदगाव या महाविद्यालयात आज माननीय आप्पासाहेबांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्यासमवेत संपन्न झाला, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विक्रम घुगे सर व सर्व प्राध्यापकांनी यावेळी मा. आप्पासाहेबांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या,
