
सिन्नर (प्रतिनिधी):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट वॉटर संस्था, डुबेरे आरोग्य केंद्र व अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींसाठी मेळावा घेण्यात आला. विद्यालयातील सखी सावित्री समिती व विशाखा समितीच्या वतीने मुख्याध्यापक रंगनाथ उगले व पर्यवेक्षक उल्हास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी वॉटर संस्थेच्या योगिता हासे यांनी सुरक्षित समाज,आपली जबाबदारी ” या विषयावर व्याख्यान दिले .त्यात समाजात मुलींची सुरक्षा किती महत्वाची आहे हे समजूनसांगितले. चांगले वागा – चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हा .विद्यार्थ्यांनीनी जीवनात संयम बाळगा.विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये तसेच मुलींनी मोबाईलचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन सौ. हासे यांनी केले. डुबेरे येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सोनाली केंद्रे यांनी किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक विविध समस्या , किशोरवयीन मुलींचा आहार, व्यायामाचे महत्त्व,पुरेशी झोप,मासिक पाळी व संदर्भातील घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जेवणात मुलींनी प्रोटीनयुक्त व कॅल्शियम युक्त सकस आहार घ्यावा असे आवाहन डॉ. केंद्रे यांनी केले. तसेच मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना व शकांना समर्पक उत्तरे दिली. यावेळी आरोग्य सेविका मनीषा वारुंगसे, अंगणवाडी सेविका सुरेखा शिंदे, महिला बचत गटाच्या चंद्रकला शिंदे, आशा स्वयंसेविका सुरेखा रूपवते, उषा वाजे परवीण शेख ,उपशिक्षिका जयश्री गोहाड, विनिता देवरे,सविता खंडागळे, वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक उपशिक्षिका कल्पना शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रेखा खंडीझोड यांनी तर आभार सीमा गोसावी यांनी मानले. यावेळी विदयालयातील सर्व मुली उपस्थित होत्या.
