
नासिक ( प्रतिनिधी);= सकारात्मक सर्व साहित्य उपलब्ध असताना, अभिजात मराठी चांगल्या साहित्याची निर्मिती ची आपल्या कडुन अपेक्षा आहे व भविष्यात, माझ्या पुढे बसलेले सारस्वत ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील अशी अपेक्षा जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी व्यक्त केली. साहित्य रंग साहित्य मंच नासिक आयोजित आषाढ पावसाळी साहित्य संमेलन चे स्वागतध्यक्ष सुहास टिपरे यांनी आजीचे हॉटेल येथे झालेल्या साहित्य संमेलन मध्ये बोलताना सुहास टिपरे यांनी सांगितलं कि कविता हा आत्म्यातून व्यक्त होणारा हुंकार आहे. आपल्या मनातील भावनांना आपल्या शब्दाच्या माध्यमातून व्यक्त झाले कि सर्वोत्तम कवितेची निर्मिती होते. सुहास टिपरे पुढे म्हणाले कि,ज्या पद्धतीने, केशवसूत कुसुमाग्रज सारख्या कवीच्याकविता मधून राष्ट्रप्रेम, माणुसकी, संवेदनशीलता सहानुभूती इतिहास असे अनेक विषय हाताळले गेले त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून आलेल्या कवी यांनी आपापल्यl प्रति्भे नुसार त्यांच्या पाऊला वर पाऊल ठेऊन नव काव्य निर्मिती चा जो प्रयत्न करत आहे, तो अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी काढले. सावरकर, लोकमान्य टिळक साने गुरुजी यांचे साहित्य जर नकारात्मक वातावरण मध्ये प्रभावी होते तर अपल्याला सर्व उपलब्ध असल्यामुळे चांगल्या प्रभावी साहित्याची निर्मिती ची अपेक्षा शेवटी सुहास टिपरे यांनी व्यक्त केली. भीमाबाई जोंधळे, कार्यक्रम च्या अध्यक्ष, डॉक्टर प्रतिभा देशमुख ( चौरे ) आशा बिरारी पाटील, प्रमुख अतिथी व आयोजक सुशीलकुमार शिंदे यांनी संमेलन ला उचित मार्गदर्शन केलें संपूर्ण कार्यक्रम चे सूत्रसंचालन सीमा ताई बागुल यांनी केलें. सौं सुनंदा साहेब राव पाटील यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन “” समाज रत्न पुरस्कार “” देऊन सन्मानित केलें. महाराष्ट्र च्या विविध भागातून आलेल्या कवी च्या कविता यांनी संमेलन खुप च रंगात आले व यशस्वी झाले. सर्व कवी यांना शिल्ड सन्मान पत्र देऊन त्यांच्या काव्य प्रतिभे चा प्रमुख अतिथी च्या हस्ते सन्मान केला. ख़ुशी मोरे यांचा त्यांच्या शैक्षणिक यश बद्दल सन्मानित केलें. लागोपाठ 3 कवी संमेलन चे यशस्वी नियोजन केल्या बद्दल आयोजक सुशील कुमार शिंदे यांचा सर्व अतिथी यांचे शुभ हस्ते शिल्ड देऊन सन्मानित केलें. कार्यक्रम चे आभार प्रदर्शन सुशीलकुमार शिंदे यांनी केलें कार्यक्रम चे यशस्वी नियोजन व मराठी भाषे विषयी तळमळीने कार्य करणाऱ्या सुशील कुमार शिंदे यांचे संपूर्ण कार्यक्रम तील प्रत्येक कवी यांनी अभिनंदन केलें आहे!!कवी संमेलन विशेष बाब म्हणजे सहभागी कवींमधून उत्कृष्ट असे क्रमांक देखील काढण्यात आले त्याचा निकाल खालील प्रमाणे आहे
प्रथम क्रमांक: माणिकराव गोडसे द्वितीय क्रमांक: यश सोनार तृतीय क्रमांक :सोनाली चव्हाण चतुर्थ उत्तेजनार्थ क्रमांक: कावेरी मदने विशेष क्रमांक: प्रतिभा देशमुख/ चौरे
