
.नाशिक -(प्रतिनिधी ) सुशिक्षित, संस्कारी व सुदृढ पिढी घडविण्याची जबादारी शिक्षकवृंद अगदी प्रामाणिकपणे कार्य करत आपला ठसा समाजात उमठवत आहे. शिक्षकांचे नियमित कामकाज, वर्ग, शाळा हाताळणी व नवीन बदल असं सर्व भार शिक्षक यांच्यावर असतो. या सर्व धकाधकीच्या जीवन प्रवासात त्यांच्या स्वतःहच्या आरोग्याच्या काळजीकडे दुर्लक्ष होत आहे हे त्यांच्या लक्षात येत, पण मार्ग कसा काढायचा .? म्हणूनच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ने सर्व गोष्टींचा अभ्यास करून व मुख्याध्यापक, शिक्षकांशी चर्चा करून स्वतःह बरोबर कुटुंबालाही आरोग्यसेवा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले. संघ व सह्याद्रि हॉस्पिटलने आज सांगताना आनंद होतोय की गुरुजनांप्रती सद्भावना आणि आदर व्यक्त करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी “गुरुजन आरोग्यम् कार्ड” अनावरण नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते केले. नाशिक जिल्ह्यातील जवळपास ३५०० शिक्षकांनी या कार्ड करिता नावनोंदणी करून आपलं आरोग्यम् कार्ड देखील प्राप्त केले. या ३५०० शिक्षकांनी सह्याद्रि हॉस्पिटल नाशिक सोबत जोडले जाऊन आपल्या १६ हजार व्यक्तींना आरोग्यसेवा मिळवण्यासाठी चळवळ उभी केली आहे म्हणूनच नाशिकचं “सह्याद्रि” शिक्षकांचं हक्काचं रुग्णालय झालंय.!आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधतं सह्याद्रि गुरुजन सन्मान आयोजित करून गतवर्षी प्रमाणे ५१ मुख्याध्यापकांचा आरोग्याच्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. तसेच आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असे मार्गदर्शन डॉ. धवल चोक्सी ( गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट ) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डीजीएम चेतन जोशी (विपणन) यांनी केले. हॉस्पिटल मधील नवीन रोबोटिक प्रणाली, तंत्रज्ञान, नवीन सुविधा याविषयी उपाध्यक्ष संजय चावला यांनी माहिती दिली. तसेच “शिक्षक पिढी घडवतात त्याचं पिढीला आरोग्याची व आरोग्याच्या क्षेत्राची आवड लागण्यास काय करता येईल यावर मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रकाश टाकला तर भविष्यात आरोग्याच्या क्षेत्रात खूप मोठी मदत होईल” असे प्रतिपादन केले. मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या विशेष सुविधाविषयी मार्गदर्शन आशिष गायकवाड ( ब्रॅण्डिंग व विपणन ) यांनी केले. कार्यक्रमात नाशिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने नवीन कमिटी सदस्य नियुक्ती व सत्कार करण्यात आले. श्री एस.बी.देशमुख, श्री प्रदिप सांगळे व श्री. दीपक गायकवाड यांनी नवीन संघांचे स्वागत व ध्येय धोरणे जाहिर केले. कार्यक्रमास श्री. नागरे बी के, श्री भागीनाथ घोटेकर, श्री अनिल माळी, परवेजा शेख असे प्रमुख अतिथी व जिल्ह्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दोन्हीच्या वतीने संघाच्या श्री. बी. के. नागरे यांनी केले.
