
. नांदगाव – (प्रतिनिधी ) मविप्र शिक्षण संस्थेच्या तालुका संचालक आदरणीय अमित भाऊ पाटील यांचा सकाळ समूह मार्फत गौरव भूमिपुत्राचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार वितरण सोहळा निम व्हॅली मालेगाव येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जेष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जेएनपीटी पोर्ट चे अध्यक्ष उन्मेष वाघ सकाळ समूहाचे महा व्यवस्थापक संजय पाटील साहेब ,संपादक अभय सुपेकर, निम ग्रीन व्हॅली चे संचालक संजय हिरे मान्यवर उपस्थित होते. बहुजनांचा मुलांसाठी इंग्रजी माध्यमांचा शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून भाऊंनी सुरू केलेली मविप्र संस्थेचे होरायझन इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव मध्ये सुरू केले व आदर्श व्रत इमारत बांधकाम सुरू आहे. भाऊंची केलेल्या सामाजिक समाजाभिमुख व शैक्षणिक कामांची दखल सकाळ समुहाने घेऊन त्यांना *गौरव भूमिपुत्राचा* या पुरस्काराने सन्मानित केले. माननीय अमित भाऊ ही व्यक्ती नसून एक संकल्पना आहे – सामाजिक व शैक्षणिक कार्याची. गौरव भूमिपुत्राचा सकाळ समूहाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयाच्या वतीने माननीय श्री अमित भाऊ पाटील यांचा पुस्तक , शाल व श्रीफळ घेऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्ष विजय काकळीज , बाळासाहेब कदम, राजेश पाटील, आयटीआयचे प्राचार्य श्री जाधव ,विद्यालयाचा मुख्याध्यापिका ज्योती काळे, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे इ. मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मुलाचे सहकार्य झाले
