
नांदगाव ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी सकाळी ११.०० वाजता केले जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत सदर कार्यशाळा घेण्यात येणार आहे .कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एन. भवरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून नांदगाव येथील डॉ .अर्चना नाईक या महिलांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन करणार असून दुसऱ्या सत्रात ॳॅड. मनीषा त्रिभुवन तसेच तिसऱ्या सत्रात नांदगावचे पोलीस निरीक्षक प दिगंबर भदाणे हे महिला हक्क संहिता विषयक नियम कायदे सुरक्षा याबाबत येत असलेल्या समस्या याच्यावर सखोल मार्गदर्शन करणार आहे. सदर कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापिका डॉ.प्राचार्य आर.एन.भवरे उप प्राचार्य डॉ. एस.ए.मराठे यांनी सदर कार्यशाळेतचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनीनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे
