
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७३ वा दिवस कोणत्याही व्यक्तीला वा राष्ट्राला थोर होण्यासाठी पुढील तीन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे.१) चांगुलपणाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास,२) मत्सराचा आणि संशयखोरपणाचा अभाव,३) जे चांगले बनण्याचा व चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना साहाय्य करणे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर त्यांना विरोध न करता ती तुमच्या मार्गाची साफसफाई आहे असे समजुन सतत पुढे चला हमखास यशस्वी व्हाल. *स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ३० आषाढ शके १९४७
*★ आषाढ वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २१ जुलै २०२५
★ कामिका एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ १९१० स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक विठ्ठल सखाराम उर्फ वि. स. पागे यांचा जन्मदिन.
★ १९९१ भारताचे तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया रचणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
