
मखमलाबाद ( प्रतिनिधी ) मखमलाबाद येथील होरायझन अकॅडमी शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित परीक्षेमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेला एकूण 74 विद्यार्थी बसले होते आणि या परीक्षेचा निकाल 98.64% लागला असून, यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये विशेष योग्यतेमध्ये 13 विद्यार्थी, श्रेणी 1 मध्ये 45 विद्यार्थी, श्रेणी 2 मध्ये 9 विद्यार्थी, श्रेणी 3 मध्ये 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या श्रीमती भाग्यश्री लाडोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक करण्यात आले .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका अनुजा घोंगे, अश्विनी जाधव,वर्षा देवकर, कविता जगताप, दिपाली जोशी आणि दिपाली लोखंडे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे, माजी सेवक संचालक डॉ. अशोकराव पिंगळे, स्कूल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे, स्कूल कमिटी सदस्या श्रीमती कल्पना ताई पिंगळे व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
