
आधिवेशनात मार्गदर्शन करतांना राज्याध्यक्ष मधूकर जंगम.तर दुस-या छायाचित्रात उपस्थित पदाधिकारी.
▪️चांदवड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना हि सेवानिवृतांची सेवा हिच परमेश्वर सेवा मानणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना असून सेवानिवृत्तांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्न संघटनेने सोडवले आहेत असे प्रतिपादन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.मधुकर जंगम यानी केले .चांदवड येथील रेणूकामाता हाॕल येथे झालेल्या संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र(खांदेश) विभाग त्रैवार्षिक अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी मंचावर संघटनेचे राज्यभरातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की,सेवानिवृतांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना वेळोवेळी आंदोलने वा न्यायालयीन लढा लढत आहे.सरकार दरबारी आपले गा-हाणे मांडणे अलिकडे जिकीरीचे झाले आहे.प्रत्येक गोष्टीसाठी आता कोर्टकचे-या करणे खूपच वेळखाऊ झाले आहे.तरीही संघटना हा लढा लढत आहे.हे आपल्या संघटित राहण्याचे यश आहे. उपदान,अंशराशीकरण ,गटविमा परतावा,वेतनत्रूटी,वेतन आयोग त्रूटी इ.प्रश्न दिवाळीपूर्वी मार्गी लागतील असे त्यांनी उपस्थितांना याप्रसंगी सांगितले. अधिवेशनास नासिक,धुळे,जळगाव,नंदुरबार व अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित केले. मेळाव्याचे प्रास्ताविक विभागिय अध्यक्ष दादाजी काकळीज यांनी केले तर चांदवड तालुका अध्यक्ष अशोक बडोगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.या अधिवेशनास राज्य उपाध्यक्ष सोन्याबापू थोरात,राज्य सदस्य प्रकाश वैष्णव,नासिक जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दिलीप दहिफळे,धुळे जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोरसे,नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष डि.के.नाईक,जळगावचे जिल्हाध्यक्ष भगवान वाघ आदींनी मनोगत व्यक्त केले.या अधिवेशनास उत्तर महाराष्ट्रातील महिला पदाधिकारी,सेवानिवृत्त शिक्षक,केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मांडलेल्या प्रश्नांवर मान्यवरांनी उत्तरे दिली. चांदवड शाखेचे नंदुभाऊ पगार,यशवंत गवारे,एकनाथ बच्छाव,पुंडलिक भारती,दिलीप निकम,इसा मियाँ शेख,वा.गं.सोनवणे वासुदेव खैरनार यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले .जनार्दन देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर अशोकआण्णा बडोगे यांनी आभार मानले.

अधिवेशनास उपस्थित प्रतिनिधी.
