
सिन्नर प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित डुबेरे येथील जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात पालक -शिक्षक संघ व माता- पालक संघाची स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे होते. व्यासपीठावर उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने ,अरुण वारुंगसे,भाऊ वारुंगसे ,अर्चना ढोली, सोमनाथ वारुंगसे,रामदास वारुंगसे ,सोमनाथ पगार आदी उपस्थित होते. पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले ,उपाध्यक्षपदी नामदेव पावसे, सचिवपदी उपशिक्षक कचेश्वर शिंदे,सहसचिव समीर सय्यद यांची तर माता पालक संघाच्याउपाध्यक्षा- अश्विनी हिरे,सचिव सुनिता ढोली,सहसचिव- गायत्री वारुंगसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच विशाखा समिती व सखी सावित्री समितीच्या पदाधिकारी व सदस्य यांची निवड करण्यात आली. यावेळी अर्चना ढोली, मंजुषा पडवळ,माणिक वारुंगसे, गणेश वारुंगसे, संदीप पावसे ,संतोष वाजे ,देविदास सुर्यवंशी आदींनी विचारलेल्या प्रश्नांना व झालेल्या चर्चेला मुख्याध्यापक रंगनाथ उगले यांनी समर्पक उत्तरे दिली. या उत्तरांनी उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले . यावेळी बोलताना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरुण वारुंगसे म्हणाले की,शाळेच्या प्रगतीसाठी पालक व शिक्षकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांची जबाबदारी सुद्धा महत्त्वाची आहे. आईने मुलींवर चांगले संस्कार करून मुलींची जबाबदारी घेतली पाहिजे. कोणत्याही पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल देऊ नये असे आवाहन वारुंगसे यांनी केले. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शिस्त, गुणवत्तावाढीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. निवड झालेल्या सर्व सदस्य व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापक उगले यांचा , विद्यालयाचे उपशिक्षक पी. आर. करपे यांना त्रिरशमी फेलोशिप मिळाल्याबद्दल तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती लाभ मिळाल्याबद्दल गौरी वाजे व आरोही जाधव तसेच मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचा ग्रामस्थामार्फत सत्कार करण्यात आला . सर्व ग्रामस्थांनी शाळेतील उल्लेखनीय बाबींचे, विविध उपक्रमांचे व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे म्हणाले की, शाळेला येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करावे. निवडलेल्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावावा. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे उज्ज्वल यश असे आव्हान वाजे यांनी केले. प्रास्तविक विद्यालयाचे पर्यवेक्षक उल्हास पवार यांनी केले. जेष्ठ शिक्षक पी.आर. करपे यांनी विद्यालयातील विविध उल्लेखनीय उपक्रमांची माहिती पालकांना देवून सूत्रसंचालन केले तर आभार सोमनाथ गिरी यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने संख्येने पालक उपस्थित होते.
