
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )येथील शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने ख्यातनाम सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांचे ‘सूत्रसंचालनावर बोलू काही’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.२३ जुलै रोजी संस्थेच्या सभागृहात सायंकाळी ५ वा. होणाऱ्या व्याख्यानात ते सूत्रसंचालन या विषयावर मार्गदर्शन करणार असून आजपर्यंत सूत्रसंचालन करताना घडलेले विविध किस्से कथन करणार आहेत. या आगळ्यावेगळ्या व्याख्यानास रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जयराम कुलकर्णी, सचिव अविनाश गोसावी यांसह कार्यकारिणी समिती सदस्यांनी केले आहे.
