
ईगतपुरी (तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर )यांजकडुन
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यात सध्या महायुती व महा विकास आघाडी हे परस्परविरोधी आघाडयामध्येच लढती होतील असे चित्र असले तरी या निवडणुका स्वबळावरच लढाव्यात. महा युती वा महा आघाडी नकोच. स्थानिक नेते, कार्यकर्ते यांना संधी कधी मिळणार ? असा सवाल करत युती व आघाडीला तीव्र विरोध होत आहे. राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीचे सरकार आहे.तर दुसरीकडे कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) व शिवसेना उबाठा गट ही महाविकास आघाडी विरोधात आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या एकत्रीत लढायच्या कि स्वबळावर याबाबत वरिष्ठ पातळीवर चिंतन सुरु आहेत. यात एकत्रीत लढावे व स्वतंत्र लढावे असे दोन्ही मतप्रवाह युती व आघाडी दोन्ही मध्ये आहे. याबाबत स्थानिक पातळीवर मात्र स्वतंत्र व स्वबळावरच लढावे अशी मागणी स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती व महा आघाडी असतानांही कुठल्याच पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी युती व आघाडीचा धर्म पाळला नाही हे उघड झाले. लोकसभा निवडणुकीत म.वि.आ.चे राजाभाऊ वाजे यांना महायुतीचे माणिकराव कोकाटे यांनी मदत केली. तर वाजे यांनी विधानसभा निवडणुकीत कोकाटेनां मदत करुन म.वि.आ.चे सांगळे यांना पराभुत करवले. हेच चित्र ईगतपुरी त्रंयबकेश्वर मतदारसंघात ही दिसले. रा.कॉ. चे माजी आमदार शिवराम झोले यांनी पुत्रासाठी स्व पक्षीय हिरामण खोसकर यांचे विरोधात काम केले.तर माजी आमदार सौ. निर्मला गावित यांनी महा विकास आघाडी विरुद्ध बंड करत अपक्ष उमेदवारी केली. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी महायुती शी बंडखोरी केली व मनसेकडुन निवडणुक लढवली.यासह अनेक विविध पक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी स्व पक्ष व युती, आघाडीशी गद्दारी केली. गंमत म्हंणजे गद्दारी करुनही हे नेते, कार्यकर्ते पुन्हा पावन झाले असुन मुळ पक्षात सन्मानाने परतले आहेत.तर काहिनीं पक्षातंरे करुन दुसर्या पक्षाचीं साथ संगत धरली आहे. राजकारणातील या निर्लज्ज पणाने इतका कळस गाठला आहे कि काहीनीं पक्ष बदलण्याचाही विक्रम केला आहे.आता तर ते मुळचे कोणत्या पक्षात होते व आज कुठे आहेत हे ही त्यांच्या ध्यानात आहे कि नाही, कुणास ठाऊक ? शिवाय ते उदया परत त्याच पक्षात राहतील याचीही शाश्वती राहिली नसुन कपडे बदलावे तसे हे लोक पक्ष बदलत आहे. दुर्दैवाने पक्षातही याच लोकाचीं चलती असुन निष्ठावंतानां मात्र कुत्रंही विचारत नाही अशी अवस्था आहे.आणि हे सगळयाच पक्षातील घाणेरडे व बजबजपुरीचे चित्र दिसत आहे. तत्व, विचार वगैरे सगळं बासनात गुंडाळुन ही मंडळी वावरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत इच्छुक अनेक आहेत. आघाडी वा युती झाली तर एकमेकाचे मित्र पक्षाचे इच्छुक नाराज होतात.मग ते एकतर पक्ष बदल करतात किंवा स्व पक्ष वा मित्र पक्ष उमेदवाराला पराभुत करुन पक्षाचीही जिरवतात.शिवाय पक्ष द्रोह करा किंवा अजुन काही.कारवाई काहि होत नाही हे पक्के ठाऊक झाल्याने कार्यकर्तेही निर्ढावले आहेत. त्यामुळे महायुती वा महा आघाडी नकोच.झाली तरी स्वकियच गद्दारी करुन पाडापाडी करतात.प्रामाणिकपणे ते कामही करत नाही.त्यामुळे युती,आघाडी चा फायदा नव्हे तर तोटाच होतो.
