
नांदगाव :- (मारुती जगधने ),नांदगाव तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित नांदगाव जिल्हा नाशिक आमदार सुहास कांदे आणि अंजुमताई कांदे यांच्या अथक प्रयत्नातून व दूरदृष्टीतून नांदगाव मतदारसंघात दूध संघ लवकरच सुरू होत आहेत दूध संकलन प्रक्रिया वितरणासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ योग्य दर व आधुनिक सुविधा मिळणार आहेत मतदारसंघाच्या दुध व्यवसाय प्रगतीची खरी सुरुवात असल्याचे मत आमदार कांदे यांनी पत्रकात व्यक्त केले .नांदगाव तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी विविध फायदे देण्यात आले त्यामध्ये शेतकऱ्यांना दूध व्यवसाय प्रशिक्षण, गाय म्हैस घेण्यासाठी अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल ,जनावरांचे आरोग्य शिबिर आयोजन, विविध शासकीय अनुदाने व योजना देखील त्यात मिळतील, जनावरांचे पशुखाद्य औषधे उपकरणे याविषयी माहिती व मार्गदर्शन दिले जाईल आणि तरुणांना स्थानिक रोजगार व डेअरी व्यवसायासाठी संधी देखील मिळणार आहे, त्यानंतर दूध संघाच्या माध्यमातून महिलांसाठी काही फायदे आहेत महिलांसाठी स्वतंत्र दूध संस्था नोंदणी, महिला बचत गट व स्वयंरोजगार महिला उद्योजकता प्रोत्साहनहन दुधावर आधारित उद्योग ,महिला सक्षमीकरणाचे धोरण महिलांसाठी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, दुध व्यवसायात महिलांचा सहभाग वाढविणे , दुग्ध संघाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळवून देणे,त्यानंतर शेतकऱ्यांना दररोज दूध विक्रीसाठी हमीभाव, व वेळेवर पैसे , गावातच दूध जमा करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने वेळ वाहतूक खर्च वाचणार, दुधाचे वजन फॅट एस एन एफ मापन प्रणालीमुळे व्यवहार पारदर्शक होणार ,गाई म्हशीसाठी वैद्यकीय शिबिरे लसीकरण व पशुखाद्य उपलब्ध करून दिले जाणार, दूध उत्पादक हे शेतीसोबत चालणारे नियमित उत्पन्नाचे साधन बनविने प्रक्रियेसाठी महिलांना व युवकांना संधी व रोजगार निर्माण होईल आणि शेतकऱ्यांचा हक्काचा सहकारी तत्त्वावर चालणारा हा प्रकल्प राहणार आहे .महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना आहे जिल्हास्तरीय विषय घटक योजना देखील आहे पी एम ई जी पी अंतर्गत दुग्ध व्यवसाय योजना आहे .
