
**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७२ वा दिवस*
सर्व धर्मांनी ध्यानावर भर दिला आहे. ध्यानावस्था ही मनाची सर्वोच्च अवस्था आहे असे योगी म्हणतात. ज्या वेळी मन बाह्य वस्तूचे अध्ययन करीत असते, त्या वेळी ते त्या वस्तूशी तादात्म्य पावते, तीत स्वतःस गमावून बसते. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञांनी दिलेली उपमा वापरावयाची झाल्यास असे म्हणता येईल की मनुष्याचा आत्मा हा स्फटिकासारखा असतो, आणि त्याच्या समीप जे काही असते त्याचा रंग तो धारण करतो. आत्मा कशाच्याही संपर्कात येवो, त्याला कशाचाही स्पर्श होवो, त्याला त्याचा रंग धारण करणे प्राप्त होते. हीच खरी अडचण आहे. त्यामुळेच तो बंधनात पडतो. आपण शरीराचा रंग घेतला आहे व आपण काय आहोत ते विसरून गेलो आहोत. यानंतर ओढवणाऱ्या साऱ्या अडचणी या एका जड देहापासून उद्भवतात.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २९ आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २० जुलै २०२५ ★ १९०८ बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पुढाकाराने “बँक ऑफ बडोदाची स्थापना.
★ १९२९ हिंदी चित्रपट अभिनेते राजेंद्र कुमार यांचा जन्मदिन.
