
मखमलाबाद विद्यालयात पालक शिक्षक संघ, माता पालक संघ,विशाखा समिती,सखी सावित्री समिती यांना मार्गदर्शन करतांना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे पालक शिक्षक संघ,माता पालक संघ,विशाखा समिती,सखी सावित्री समिती यांची स्थापना करण्यात आली.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड, त्र्यंबक कालेकर,विठ्ठल पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,ज्येष्ठ शिक्षक प्रताप काळे,भाग्यशाली जाधव या उपस्थित होत्या.मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करू दीपप्रज्वलन करण्यात आले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे व त्यांच्या गीतमंचाने ईशस्तवन व स्वागत गीत अतिशय सुरेल आवाजात सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी सर्व समित्यांची पालकांना सविस्तर माहिती सांगितली.समितीमध्ये आपली काय जबाबदारी असेल याचीही जाणीव करून दिली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी या विविध समित्यांची स्थापना खालील प्रमाणे करण्यात आली.**पालक शिक्षक संघ**अध्यक्ष = प्राचार्य संजय डेर्ले**सचिव = प्रमोद पगार**सदस्य = प्रभाकर पगार,रमेश पिंगळे,ददेल मनबहादूर,त्र्यंबक कालेकर,बबन गवारे,गोकुळ मुर्तडक,सुनील दिघे,शरद म्हैसधुणे,विठ्ठल पिंगळे,अभिजीत सोनवणे.**माता पालक संघ* *अध्यक्ष = प्राचार्य संजय डेर्ले**सचिव = भाग्यशाली जाधव**सदस्य = दिपाली भोये,सपना साळी,प्रतीक्षा पवार,वैशाली कोतकर,शितल म्हैसधुणे,वैजयंती बर्डे**विशाखा समिती**अध्यक्ष = प्राचार्य संजय डेर्ले**सचिव = सुनिता उशीर**सदस्य = मनीषा पगारे,विजया, मुळाणे,हेमलता काकड,कविता काकड,मनीषा पिंगळे,आशा सांगळे**सखी सावित्री समिती**अध्यक्ष = प्राचार्य संजय डेर्ले**सचिव = पूनम पाटील**सदस्य = स्वाती तांदळे,संदीप पिंगळे,जयश्री भांगरे**याप्रमाणे सर्व समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. याप्रसंगी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.विजया मुळाणे यांनी सांगितले की,शाळा सुटण्याच्या वेळी गेटवर वॉचमन असावा म्हणजे गर्दीच नियंत्रण योग्य तऱ्हेने करता येईल.वैशाली कोतकर यांनी शालेय वातावरण, शिस्त,अभ्यास,संस्कार, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे सांगितले.गोकुळ मुर्तडक यांनी सांगितले की,शालेय वातावरण अतिशय चांगले असल्यामुळे शाळेचा अभिमान वाटतो.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की,ज्या पालकांची पालक शिक्षक संघ,माता पालक संघ,विशाखा समिती,सखी सावित्री समिती अशा विविध समितीमध्ये निवड झाली आहे त्यांनी निश्चितच चांगल्या प्रकारे काम करावे.सर्व समिती सदस्यांना त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार, दिपाली कोल्हे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिक अनिल पगार,प्रमोद पगार,भाग्यशाली जाधव,योगिता कापडणीस,स्वाती होळकर, दिपाली कोल्हे,सुनिता उशीर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमास पालक, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
