
मुजीब पठाण संचालक श्री डोंगरे टी एम व श्री किशोर भाऊ लहाने यांनी अभिनंदन केले
वेहळगाव (प्रतिनिधी). नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गुरुजन सन्मान हा पुरस्कार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव विद्यालयाचे प्राचार्य श्री मुजीब खान पठाण यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर संजय चावला, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप सांगळे, श्री एस बी देशमुख सर यांच्या हस्ते सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी *गुरुजन सन्मानपत्र* देऊन श्री मुजीब पठाण यांचा सन्मान करण्यात आला श्री पठाण यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री कोंडाजी मामा आव्हाड, सरचिटणीस श्री हेमंत आप्पा धात्रक तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी श्री पठाण यांचे अभिनंदन केले.
