
भारत जाधव ( मराठी भाषा अनुवादक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय मुंबई ) यांचे प्रतिपादनकर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त निफाड महाविद्यालयात, भारत जाधव ( मराठी भाषा अनुवादक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय मुंबई ) यांचे व्याख्यान संपन्न
निफाड( प्रतिनिधी) दि. १९ जुलै कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि राजश्री शाहू महाराज यांनी सत्यशोधकीय विचार नाशिक जिल्ह्यामध्ये रुजविण्याचे काम केले. सत्यशोधकीय जलशाच्या माध्यमातून गाव, खेड्यामध्ये जनजागृती करून अज्ञान आणि अंधकारमय समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यासोबतच आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने उदाजी मराठा बोर्डिंग च्या रूपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी आईच्या रूपाने या समाजाचे सेवा केली. असे प्रतिपादन श्री भारत जाधव (भाषा अनुवादक मराठी भाषा विभाग, मंत्रालय मुंबई) यांनी केले. कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निफाड येथे आयोजित केलेल्या कर्मवीर गणपत दादा मोरे पुण्यस्थिती कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, संचालक शिवाजी गडाख, महिला संचालिका श्रीमती शोभाताई भागवत बोरस्ते, डॉ. उत्तमराव डेर्ले,सौ मंजीरीताई कुंदे,रवींद्र मोरे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, यांच्यासह महविद्यालय विकास समिती, शालेय समिती सदस्य उपस्थित होते.श्री भारत जाधव पुढे म्हणाले कि, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या स्थापनेतून शिक्षणाचा प्रसार शहरापासून गावकुसाबाहेरील विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्याचे कार्य कर्मवीरांनी केले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा घेत आज मविप्र समाज व त्याचे सर्व घटक कार्य करीत आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असून शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रगती करताना समाजाने आणि विद्यार्थांनी कर्मवीरांचे कार्य आणि स्मरण करीत यशस्वी जीवनाची वाटचाल करताना, समाजमूल्ये, जीवनमूल्ये आणि विचारमूल्ये यांचे जतन करावे. कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी शैक्षणिक उन्नतीबरोबरच सत्यशोधकी विचार लोकांपर्यत पोहचविण्याचे कार्य करीत समाजप्रबोधन केले, यातून समाजाला प्रगतीच्या दिशा मिळाल्या. त्यामुळे गणपत दादांचे कार्य स्मरणात ठेवीत त्यांचे नेतृत्व, समंजसपणा आणि लढावू वृत्ती या गुणांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी किमान आपण एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न सोडू नयेअध्यक्षीय विचार व्यक्त करताना मविप्र सभापती बाळासाहेब श्रीरसागर म्हणाले, ‘‘ मविप्र समाज ही संस्था कर्मवीरांचे कार्य आणि विचार यांना अनुसरून कार्य करीत आहे. त्यांनी समाज उन्नतीसाठी निश्चित केलेले ध्येय आज पूर्ण होत असताना आपले सर्वांचे योगदान निश्चित मोलाचे आहे. मविप्र समाजाचे प्रगतशिल आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या रूपाने कर्मवीरांनी निर्माण केलेल्या कार्यांचे फलित आज जगभर दिसत आहे. विद्यार्थ्यांनी मविप्रच्या माध्यमातून शिक्षण घेत प्रगती करण्याबरोबर कर्मवीरांचे ध्येय आणि कार्य समाजाच्या दृष्टीस आणावे, आजचे सुप्रसिद्ध व्याख्याते भारत जाधव हे मविप्र संस्थेचे माजी विद्यार्थी आहे. आज अश्या माजी विद्यार्थी रूपाने निश्चितच मविप्रचा ब्रँड महाराष्ट्रभर संस्थेचा नावलौकिक वाढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मविप्र उपाध्यक्ष मा. विश्वासराव मोरे म्हणाले, कर्मवीर गणपत दादा मोरे यांचे कार्य शेती, शिक्षण, बहुजन समाजाचे कल्याण, शेतक-यांचे प्रश्न सोडविणे, महिला शिक्षण याबरोबर समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला जागृत केले. मविप्र समाजाच्या योगदानात गणपत दादा यांच्या धर्मपत्नी शारदामाईचे काम देखील विसरू नये. त्यांच्या कार्यचे स्मरण करीत त्यांच्या विचारांना अनुसरण्याची गरज असल्याचे सांगितले.उपसभापती देवराम मोगल म्हणाले,‘‘ निफाड तालुक्यातील कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या सारख्या आदर्श आणि दिशादर्शक समाजसुधारक आणि सत्यशोधक विचारवंतामुळे समाजाला दिशा मिळाली. शिक्षणापासून वंचित असणा-यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे केलेल कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे. शिक्षणाबरोबर समाजाची इतर क्षेत्रात उन्नती व्हावी,प्रबोधन करावे यासाठी केलेले कार्य कायम स्मरणात असावेत.’’ संचालक शिवाजी गडाख म्हणाले, मविप्रच्या माध्यमातून कर्मवीरांनी समाजिक ऐक्य निर्माण केले. आज नासिक शहराचा आणि जिल्हयाचा विकासात मविप्र समाजाचे योगदान मानले जात आहे. यात कर्मवीर गणपत दादा मोरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.’’ कार्यक्रमाची सुरूवात कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले, कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक परीवर्तन व्हावे यासाठी सत्यशोधक विचारांची प्रेरणी केली. या कार्यक्रमास माधवराव गीते, अशोक कुंदे, रमेश जाधव, जानकीराम धारराव, अँड. प्रवीण ठाकरे, अशोक वडघुले, श्याम शिंदे, सुधाकर कापसे, रामनाथ धारराव, सचिन धारराव, योगेश कुंदे, वसंत कापसे, चंद्रकांत कुशारे, मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहल जाधव तसेच सभासद प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश बनकर यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण ढेपले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापक शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.
