
सोनांबे (प्रतिनिधी)नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून ज्या कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उभारणीत महत्वाचे योगदान दिले त्यात कर्मविर गणपतदादा मोरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल असे प्रतिपादन सोनांबे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी केले ते विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथी निमित्त विद्यालय परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले पर्यवेक्षक दिगंबर जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.योगिता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे यांनी आभार मानले.यावेळी सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव,शालेय राष्ट्रपती ज्योती पाटील,क्रीडा शिक्षक दीपक पगारे,जनाबाई सुडके,नवनाथ माळी, किरण पवार, भारती धाकतोडे,मीना केदार ,शबानाबी कादरी,रुपावली काळे,मिलिंद पाटील ,सुहास जुन्नरे,रुपाली महाले,वर्षा मोरे,सोनाली पाटील,भाऊसाहेब दहिफळे, रोहिणी पवार, ग्रंथपाल पुष्पा घोटेकर,दिपाली घोटेकर, संवेदीता जाधव,निवृत्ती साबळे,सुनील पवार ,जालंदर कांडेकर ,राजेंद्र पालवे,राम शेळके,भाऊसाहेब तांबे,संकेत शिंदे,अनिकेत चतुर,वैभव शिंदे आदी सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
