
नांदगाव (वार्ताहार)- “नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,संचलित व्ही.जे.हायस्कूल नांदगाव येथे शुक्रवार दिनांक १८/७/२०२५ रोजी गुणंवत विद्यार्थी गुणगौरव समारंभ मा अध्यक्ष शालेय समिती श्री.संजीव धामणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री पवन जयचंद पाटणी (माजी विद्यार्थी , प्रसिद्ध उदयोग पती),श्री. निलेश पटणी यांच्या उपस्थित संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्या श्री. ठाकरे सरांनी करून दिला शाळेच्या निकालाची परंपरा व वैशिष्टये विषद केली . इ. १०वी केद्रांत व शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थीनी कु.थोरे रोशनी व कु प्रेम दुगड यांनी मनोगत व्यक्त करतांना शाळेचे व शिक्षकांचे ऋण व्यक्त केले गुणवंत व्हा यशवंत व्हा . मिळालेले संस्कार व मुल्य / शिस्त हेच यशस्वी जीवनाचा मंत्र आहे. हे विचार प्रमुख पाहुणे पवन जयचंद पाटणी यांनी व्यक्त केले तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री संजीव धामणे यांनी मूल्य व संस्कार कसे उपयोगी पडतात ते सांगितले

. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्य वराच्या हस्ते करण्यात आला १०वी १)रोशनी थोरे १०वी प्रथम२ ) राठोड श्रावणी व सोनवणे दर्शन – द्वितीय क्र.३) जोखर दिक्षा ४) पगार धनश्री५) सुर्यवंशी साक्षीतसेच शिष्यवृती परिक्षेत कु. स्पंदन कागंणे (जिल्ह्यात २५७ क्रमांक )२ ) गायकवाड सोहम (जिल्ह्यात ६८क्रमांक )३)nmms मध्ये बागोरे अनुस्का व शिंदे रोषन शिष्यवृती प्राप्त ४)MTS मध्ये अत्रे साची सचिन ( विशेष प्राविण्य प्राप्त )५ )इंटरमिजिए परिक्षा कु.चव्हाण जयदिप विजय( राज्यात ( ८वा क्र ) या चे संचलन श्रीमती निवेदिता सांगळे यांनी केले सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शाळेचे मुख्या.श्री.लक्ष्मीकांत ठाकरे,पालक संघ उपाध्यक्ष श्री.संदिप जेजुरकर श्रीमती जानवी शर्मा श्री.थोरे ,शिक्षक प्रतिनिधी श्री नवसारे सर , श्रीमती झोडगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवंराचे ईशस्तवन शाळेच्या विद्यार्थीनींनी व श्रीमती देवरे सुनिता स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवतेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मान्यवरांचा परिचय सौ. रुपाली झोडगेकर ह्यांनी करून दिला. उपस्थित मान्यवराचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी श्री . आहिरे प्रविण ह्यांनी अतिशय शरोशायरी युक्त शैलीत केले. कार्यक्रमासाठी टी.एम. सदस्य श्री.गुलाब पाटील ,श्री.भास्कर मधे आदींसह शाळेतील सर्व पदाधिकारी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यां सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.——————
