
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन करताना प्राचार्य संजय डेर्ले व ज्येष्ठ शिक्षक वृंद
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद या विद्यालयात लोकशाहीर,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक प्रताप काळे,अनिल पगार,क्रांतीदेवी देवरे,योगिता मोगल,तुकाराम तांबे,बाळासाहेब पवार,सुरज जाधव,अभिजीत न्याहारकर उपस्थित होते.विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.अण्णाभाऊ साठे हे वंचितांसाठी लढणारे होते. अण्णाभाऊंनी अनेक कथा,कादंबऱ्या लोकनाट्य लिहिली.फकीरा,माकडाची माळ,वैजयंता यासारख्या ३५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत.असा महान साहित्यसम्राटाचा मृत्यू १८ जुलै १९६९ रोजी झाला.ज्येष्ठ शिक्षक प्रताप काळे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली.अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली.अण्णाभाऊंनी ‘लाल बावटा कलापथक’ स्थापन केले.आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका सुनिता उशीर यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
