
कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन करताना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,प्राचार्य संजय डेर्ले,ज्येष्ठ शिक्षक वृंद व सहभागी विद्यार्थी.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद या विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर गणपतदादा मोरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.कु.स्वरा देशपांडे, कु.साक्षी चितारे यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.नाशिक जिल्ह्यातील एक एक निष्काम कर्मयोगी,व्रतस्थ व्यक्तिमत्व,निस्वार्थीपणे समाजसेवा करणारे,सत्यशोधक कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी नाशिक जिल्ह्यासाठी फार मोठे योगदान दिलेले आहेत.बहुजन समाजाने शिक्षित व्हावे यासाठी सत्यशोधक जलशांद्वारे गणपतदादा यांनी चळवळ उभी केली.जलशांच्या माध्यमातून उदाजी मराठा वसतीगृहासाठी पैसा व धान्य जमा करीत. समाजकारणाची त्यांना जास्त आवड होती.राजश्री शाहू महाराजांवर त्यांची नितांत श्रद्धा होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रज्ञा चांगले,ज्येष्ठ शिक्षिका योगिता मोगल यांनी केले.इयत्ता ७ वी ई व १० वी फ या वर्गातील सहभागी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक मोहिनी खैरनार,अभिजीत न्याहारकर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.आभार प्रदर्शन कु.श्रद्धा मानकर व ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

