
भालूर (वार्ताहर) वडाळी खुर्द येथे दिनांक 17/07/2025 रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत नानाजी देशमुfख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा टप्पा 2 अंतर्गत मका पिक महिला शेतीशाळा वर्ग आयोजित करण्यात आला.सदर शेतीशाळेस उपस्थित महिलांचे स्वागत ICM टाळी वाजवुन केले. सदर शेतिशाळा वर्गात महिला शेतकऱ्यांना मका पिक खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, ट्रायकोडर्मा, गांडूळ खत, निविष्ठांचा वाजवी वापर तसेच मका पिकावरील किड व रोग, मित्र कीटक ओळख, दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत, वापर व उपयोग याची माहिती श्री. वीरेंद्र तवले सहाय्यक कृषि अधिकारी वडाळी बुद्रुक . यांनी करून दिली. तसेच निबोळी अर्क फवारणी व महा जैविक चा वापर, फायदे याची सविस्तर माहिती श्री. राहुल जैन साहेब सहायक कृषी अधिकारी यांनी दिली.तसेच सर्व महिलांनी शेतीशाळा प्लॉट ला भेट देऊन निरीक्षणे घेण्यात आले त्यावेळी त्यांना शेतात मित्र कीटक आढळून आले व ओळखता आले याचे सर्व महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसुन आले. सदर कार्यक्रमास गावातील मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या.त्यानंतर अल्पोपहार व चहा घेऊन शेतिशाळा वर्गाची सांगता केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक कृषी अधिकारी श्री.राहुल जैन, व्ही जी वडीतके, भगवान गवळी, के आर कडू एस वाय पवार डी डी ठाकरे स्वप्निल गावडे गौरव क्षीरसागर यांनी अथक परिश्रम घेतले
