
वेहळगाव ( प्रतिनिधी) नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत Vinoba App मध्ये Post Of the Month चे विजेते वेहेळगाव केंद्रातील जिल्हा परिषद शाळा सावरगाव येथील उपक्रमशील शिक्षक श्री गणेश साळुंखे यांना आज Vinoba Team कडून सन्मानित करण्यात आले..नांदगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.प्रमोद चिंचोले साहेब व विनोबा टिमचे जिल्हा समन्वयक श्री.कृष्णा घायाळ सर यांच्या हस्ते आज पोस्ट ऑफ द मंथचा अवार्ड , प्रशस्तिपत्रक व बॅग मिळाली.श्री गणेश साळुंखे सर यांचे नांदगाव गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले व शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
