
लासलगाव( प्रतिनिधी ) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व प्रथम वर्ष वाणिज्य विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ गुरुवार दिनांक १७ जुलै २०२५ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे CEO श्री.मनोहर जाधव यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग, सहकार व उद्योग क्षेत्रातील संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त आणि उत्तरदायित्वाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गांगुर्डे, वैष्णवी विसे, सुहानी शुक्ला, समीक्षा हिरे व अक्षदा कुलथे यांनी केले, तर आभारप्रदर्शन गौरव पालवे याने मानले. या कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य विभागाचे डॉ.मनोहर मोरे, प्रा.विरेंद्र आहेर, प्रा.सृष्टी थोरात, प्रा.राधा खांडगौरे आणि प्रा.कावेरी गुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
