
सिन्नर नगरपरिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित कदम यांचा सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके
सिन्नर (प्रतिनिधी) नव्याने रुजू झालेले, अभिजित कदम यांनी नुकताच सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची रावेर (जि. जळगांव) येथून सिन्नर येथे बदली झाली.त्यांचा सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी स्वलिखित,”हास्यवटी.. विनोदातून प्रबोधन” पुस्तक व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी सिन्नर मधील औद्योगिक सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक विषयावर अनौपचारिक चर्चा करून माहिती करून घेतली.
