
निगडोळ : – येथील रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या ज्ञानसंकुलात आज बुधवार दि.१६ जुलै २०२५ रोजी ‘एक पेड माँ के नाम’अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.मुख्याधापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक कापडणीस एन.जे.यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.शिक्षकवृंद सौ.गायकवाड पी.व्ही.बेद्रे एस.व्ही.वाघमारे ए.बी. व ग्रा.पं.निगडोळच्या ग्रामसेविका सौ.थविल मॅडम यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले.प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरीही आईसमवेत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षकेत्तरवृंद भामरे टी.व्ही व देवरे व्ही.ए.यांनीही अनमोल सहकार्य केले.
