
नांदगाव : (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख निर्भीड दैनिक सकाळच्या वतीने गौरव भूमिपुत्रांचा हा विशेष पुरस्कार नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगाव येथील संचालक इंजि.अमित पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाकडून दिल्या जाणाऱ्या “गौरव भूमीपूत्रांचा” हा विशेष पुरस्कार नांदगांव तालुक्याचे साकोरा येथील भूमिपुत्र मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक इंजि .अमित भाऊ बोरसे पाटील यांना जाहीर झाल्या बद्दल समस्त बोरसे पाटील परीवार व साकोरा ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. व त्यांना राजकीय , सामाजिक, शैक्षणिक वाटचालीसाठी. शुभेच्छा व अभिनंदन केले जात आहे. .
