
नाशिक (प्रतिनिधी). द्यार्थी दशेतून हरीतसंस्कार* करणारी अत्यंत समर्पक अशी *हिरवांकुर फाउंडेशनची* टिम पर्यावरण विषयी अनेक उपक्रम नाशिक मध्ये व नाशिकच्या बाहेर यशस्वीरित्या साकारते आहे. *त्र्यंबकेश्वर येथील दहेगाव* येथील कुलकर्णी परिवाराने अतिशय मेहनतीने उभ केलेले *एकांत फार्मस्टे या कृषी पर्यटन केंद्रात* हिरवांकुर परिवाराने *वृक्षारोपण* (देशी झाडांचे) केले. *कुलकर्णी परिवाराने रांजणगडाच्या पायथ्याशी साडेपाच एकर मध्ये एकांत फार्मस्टे – कृषी पर्यटन केंद्र निर्माण केले आहे* .केंद्रामध्ये गोपालन तसेच देशी झाडांचे प्रदर्शन तसेच मराठमोळ्या संस्कृतीचा परिचय सर्वांना व्हावा अशा वास्तू निर्माण केलेले आहेत. आर्कि. वृषाली ,सोनाली ,पल्लवी,सिद्धी व चैतन्य कुलकर्णी या भावंडांनी एकांत फार्म ची निर्मिती केलेली आहे .हिरवांकुर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष निलयबाबु शाह जैन यांनी प्रास्ताविक केले .सौ. नलिनी व राखी दिदी यांनी सूत्रसंचालन केलं. वृक्षारोपण करताना सर्व स्वयंसेवकांनी वृक्षवंदना म्हटली .नाशिक कोअर कमिटीचे डॉ संदीप भानोसे व मधुर अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी रफिकजी व्होरा, अश्विनी भट, सुनील भट,विठ्ठल चौधरी, सौ. ज्योती देवरे श्री व सौ कुलकर्णी परिवार उपस्थित होते.
