
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारीच्या जीवनातील गझल, शेरोशायरी आणि चित्रपटांतील सुमधुर गाण्या़ंचा खजिना उलगडवून दाखविणारी “सुनहरी जिल्दवाली किताब” ही अनोखी मैफिल ख्यातनाम साहित्यिक आणि सादरकर्त्या तन्वी अमित यांच्यासह सहकलाकार डॉ.विशाखा जगताप, आर्कि.परिणिता इनामदार यांनी रंगवली. तन्वी अमित यांची संकल्पना, लेखन आणि अभिवाचन केले. त्यांना सुरेख साथ देत उर्दू शेरोशायरी आणि गझल यांची प्रत्ययकारी माहिती परिणिती इनामदार यांनी दिली. तर डॉ.विशाखा जगताप यांनी आपल्या सुमधुर आवाजात मीनाकुमारीच्या चित्रपटातील गाणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी कलावंतांनी सादरीकरण केलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा करीत भविष्यात अशाच उत्तमोत्तम कार्यक्रमांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, उपसचिव रवींद्र चंद्रात्रे, उपसचिव श्रीकांत मोहरील, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, अनिल सहस्रबुद्धे, सुधाकर सोनवणे, रमाकांत होनराव, राम कुलकर्णी, दिलीप भिंगारकर, सतीश चितळे, चंद्रकांत झाडीकर, डॉ.सहस्त्रबुद्धे, वसंत उपासनी, वैजयंती चंद्रात्रे, मेघना रास्वळकर, वीणा जोशी, शालिनी डहाळे, मृणाल प्रभुणे, ज्योती जोशी, दीपाली भिंगारकर, माधवी कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी आदींनी विशेष परिश्रम घेतले. सुनंदा गोसावी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुधा डमरे यांनी सूत्रसंचालन, प्रार्थना आणि ऋणनिर्देश केला.
