
. नांदगाव – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल स्कूल नांदगाव या विद्यालयात लोकशाही, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .याप्रसंगी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे , पर्यवेक्षक श्री अविनाश शेवाळे सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचा उपशिक्षिका श्रीमती स्मिता केदारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी बोलताना अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळी महत्त्वाची भूमिका बजावली. अण्णाभाऊंनी ‘लाल बावटा कलापथक’ स्थापन केले. त्यांनी दलित साहित्य संमेलनात “पृथ्वी ही शेषनागाचा मस्तकावर तारलेली नसून दलित आणि कामगारांचा तळहातावर तारलेली आहे”हे सांगितले. अण्णाभाऊंनी फकीरा, माकडाची माळ यासारख्या ३५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत इ. माहिती सांगितली. असा महान साहित्यसम्राटाचा मृत्यू १८ जुलै १९६९ रोजी झाला.
