

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७० वा दिवस सागराचे पाणी सूर्य वाफेच्या रूपाने शोषून घेतो आणि पर्जन्यधारांच्या रूपाने पुन्हा त्या सागराला परत करतो. तुम्ही ही असेच एक साधन आहात. पुन्हा देता यावे यासाठी तुम्ही घेता. म्हणून मोबदल्याची अपेक्षा न करता सतत देत राहा. जेवढे जास्त द्याल तेवढे जास्त तुमच्याकडे परतून येईल. निखळ, निष्काम भावनेने आणि प्रेमाने जो काम करतो, तो त्याचे फळ काय मिळेल याची अपेक्षा कधीही करत नाही. सरिता सागरात स्वतःला सतत समर्पित करीत असते आणि सतत भरली जात असते म्हणून सागराला समर्पण करण्याचे कधीही थांबवू नका. ज्या क्षणी थांबाल त्याक्षणी तुमचा मृत्यू ठरलेलाच आहे.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर २६ आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १८ जुलै २०२५
★ १९१८ महात्मा गांधींचे अनुयायी, दक्षिण आफ्रिकेचे कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला तथा मदीबा यांचा जन्मदिन.
★ १९६९ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुरस्कर्ते, लेखक, कवी व समाजसुधारक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन.
★ २०१२ हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, लोकसभा सदस्य, सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतीदिन.*
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
