
वडांगळी (प्रतिनिधी)… मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय वडांगळी या विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. शाळा व विद्यार्थी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे विद्यार्थ्यांना लोकशाहीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांमधून भविष्यात भावी नेतृत्व उदयास यावे आजच्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याची भावी राजकीय पिढी तयार करता यावी. यासाठी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे त्यांना नेतृत्व करण्याचे कौशल्य विकसित व्हावे, यासाठी विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ स्थापनेसाठी लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आले. यासाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली मतदानाच्या आधी दोन दिवस नियोजन करून उमेदवारी अर्ज भरणे, उमेदवारी अर्ज छाननी, तसेच उमेदवारी जाहीर करणे व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडणे अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले. यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजाराम खेताडे यांनी व निवडणूक आयुक्त म्हणून शंकरराव सांगळे यांनी काम पाहिले. विद्यालयातील प्रत्येक वर्गातील वर्ग प्रतिनिधी व वर्ग मंत्रिमंडळातील सदस्य मतदार म्हणून या प्रक्रियेत सहभागी झाले होते. त्यातील मंत्रिपदासाठी इच्छुक उमेदवारांना संधी देण्यात आली सर्व वर्ग प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.व लगेच एक तासाने मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.या दरम्यान त्याच दिवशी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुभाषराव ठोक यांची राष्ट्रपती म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. आज दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांनी राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रपतींनी शालेय मंत्रिमंडळातील पंतप्रधान उपपंतप्रधान व इतर मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.त्यात निवडून आलेले पदनिहाय विद्यार्थी पुढील प्रमाणे…१)राष्ट्रपती…. सुभाषराव यादव ठोक. २)पंतप्रधान… सिद्धी रामप्रसाद खुळे.३)उपपंतप्रधान… स्वरित किरण खुळे. ४)शिक्षण मंत्री… गौरव किरण खुळे. ५)अर्थमंत्री…. चिन्मय विक्रम खुळे. ६)क्रीडामंत्री… कृष्णा रमेश खुळे.७)आरोग्य मंत्री… आदित्य दीपक खुळे. ८)स्वच्छता व शिस्त मंत्री…. प्रांजल प्रकाश खुळे. ९)सांस्कृतिक मंत्री…. तनिष्का नानासाहेब खुळे. १०)पर्यावरण मंत्री… समृद्धी शशिकांत खुळे. ११)सहल मंत्री… श्रीस सुदेश खुळे. वरील सर्व निवडून आलेल्या पंतप्रधान व मंत्र्यांचा शपथविधी घेऊन मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार व पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.पंतप्रधान म्हणून निवडली गेलेली सिद्धी खुळे हीने यापुढे शालेय कामकाज लोकशाहीनुसार चालविण्याची ग्वाही दिली. यानंतर मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांनी मंत्रिमंडळाला मार्गदर्शन करताना मविप्र संस्थेच्या शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीप्रमाणे पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाने शालेय कामकाज करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन संदीपराव म्हस्के यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन बाळासाहेब सांगळे केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
