
वडांगळी.(.प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात थोर शास्त्रज्ञ न्यूटन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, विज्ञान शिक्षक श्रीमती मोहिनी क्षीरसागर,मनीषा आगळे, राजश्री बोडके, समिती प्रमुख भाऊसिंग पंढुरे, शामराव गोसावी, मधुकर बागुल आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव सांगळे यांनी केले अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार म्हणाले की विज्ञानामधील विविध शोध व शोध लावणारे शास्त्रज्ञ यांनी भारतीय व जगातील तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल करून विविध शोध लावून भारताचे नाव उज्वल केले आहे त्यांच्या प्रति आपण कृतज्ञता भाल व्यक्त केला पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब अडसरे यांनी केले. आभार तुकाराम सानप यांनी मांनले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते….
