
नाशिक [ वृत्तसेवा ] प्रत्येक मानसावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडण्याकरीता,मानव जातीला सुरक्षा प्रदान करण्याकरीता, प्रत्येक क्षेत्रातील सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक कार्यात सहकार्य करण्या करिता अखिल भारतीय मानवाधिकार संघटन संस्था काम करते.अशा संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मा. गायत्री ताई अनिल रामटेके रा. बल्लारपूर जी. चंद्रपूर यांची मा. शिवदास नारायण महाजन राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मानवाधिकार संघटन.यांनी पुढील तीन वर्षा करिता नियुक्ती केलेली आहें

.मा. गायत्री ताई रामटेके यांनी आतापर्यंत माता रमाई, माता सावित्री बाई फुले, आणि माता जिजाऊ मॉ साहेब यांच्या जीवनावर आतापर्यंत 160 एकपात्री प्रयोग सादर केलेले आहेत. या व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात खूप मोलाचे कार्य करीत आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतीक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेलेआहेत. त्यांच्या सामाजिक विधायक कार्याची दखल घेऊन त्याची निवड करण्यात आलेली आहें.दि १५ जुलै २०२५ ला पुणे येथे नियुक्तपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, या वेळी आ.शिवदास नारायण महाजन राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. रामकृष्ण सेहगल. महाराष्ट्र राज्य सल्लागार, ॲड विद्या बागडे राष्ट्रीय उपाध्यक्ष (युथ ) आ. नागनाथ लष्करे , राष्ट्रीय उपाध्यक्ष, मा. शिवनारायण कुशवाह सेक्रेटरी, मा. महेश चाकणकर राज्य उपाध्यक्ष (युथ) आदि मान्यवर उपस्थित होते.मा गायत्री ताई रामटेके यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या मुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामंध्ये,आणि त्याच्या सर्व मित्र मंडळी व चाहत्या वर्गानी आनंद व्यक्त केला आहें विशेष करून नाशिकमधून साहेबराव नंदन तात्या यांनी फोनद्वारे अभिनंदन करून, पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या
