
कवी,लेखक व प्रसिद्ध वक्ते:- रविंद्र मालुंजकर
नाशिक :- गंगापूररोडच्या प्रमोदनगर येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांच्या काव्य-व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या सभागृहात रविवार दि.२० जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता कवी रवींद्र मालुंजकर हे ‘चला कवितांच्या गावात…’ या विषयावर कविता, गप्पागोष्टी, किस्से सादर करून मैफिल रंगवणार आहेत. या आगळ्यावेगळ्या व्याख्यानास रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव सावंत, किशोर कुलकर्णी यांसह कार्यकारिणी सदस्य आणि सभासदांनी केले आहे.
