
नांदगाव (प्रतिनिधी). नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या मध्यम प्रकल्पावरील क्षतीग्रस्त उजवा व डावा कालवा कामासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांची बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीतून सन्माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक दाखवली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.सद्यस्थितीत सदर प्रकल्पाचे दोन्ही मुख्य कार्यवाहीतील बांधकामे माती भराव क्षतिग्रस्त झाले असून आवर्तन काळात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते.

परिणामी धरणात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही या अनुषंगाने या कालव्यांचे भराव, दुरुस्ती व बांधकाम, मजबुतीकरण अस्तरीकरण, झाल्यास परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.सोबतच गिरणा डावा उजवा वाढवी कालव्याची बंदिस्त पाईपलाईन व मांजरे ते नगाव पाटाचे खोलीकरण दुरुस्ती करून अस्तरीकरण करण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे, सदर प्रस्ताव मालेगाव नाशिक कार्यालयानंतर आता संभाजीनगर कार्यालयात असून आठ दिवसात तो मागवण्याची आदेश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे. या बैठकीत सन्माननीय मंत्री महोदय तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

