
नांदगाव (प्रतिनिधी ) येथील मविप्रच्या आदर्श प्राथमिक शाळेत. कू. शिवन्या जाधव या मुलीने आपली मैत्रीण कू. पूनम हिला शालेय गरजू वस्तू देऊन एक समाजात मैत्रीचा आगळा वेगळा संदेश दिला. ती आदर्श प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकते. कू शिवन्या शिवाजीराव जाधव रा. चांदोरा तिने अनोखा उपक्रम राबून आपल्या मैत्रीनीला मदत म्हणून शालेय साहित्य दिले . व मैत्रीचा सामाजिक संदेश दिला. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. .शिवन्या जाधव हिने आपली मैत्रीण विद्यार्थिनी कू. पूनम शिंदे रा. नांदगाव हिची परिस्तिथी नाजूक असल्यामुळे आपल्या मैत्रिणीला एक मदतीची भावना तिच्या मनात आली. व या बाबत शिवण्याने आपले वडील. शिवाजीराव जाधव रा.चांदोरा ( शेतकरी ) यांना सांगितली शिवाजीराव यांनी आपल्यामुलीचे विचार व भावना लक्षात घेऊन अभिमानाने तिला होकार दिला आणि शाळेतील गरजू वस्तू, शाळेचा ड्रेस, बॅग, वह्या, पुस्तक, पाणी बॉटल, चप्पल शाळेय साहित्य दिले.,नांदगाव येथील आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षक व कू. शिवन्या यांच्या हस्ते विद्यार्थिनी कू पूनम शिंदे हिला शालेय वस्तू भेट दिली व शिवन्या हिने गरजू विद्यार्थांना शालेय वस्तू देऊन एक छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.शिवन्या जाधव विद्यार्थ्यांना म्हणाली की, आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून,किंवा खाऊचे जमलेले पैसे गरीब व गरजू मुलांना शाळेतील भेट वस्तू देऊन एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करू शकतो.म्हणून मी एक छोटासा प्रयत्न केला. कु.शिवन्या जाधव हिच्या पालकांनी आदर्श शाळेतून असे विचार व प्रेरणा मिळते म्हणून अभिमानाने आदर्श शाळेचा देखील त्यांनी आभार मानले व आनंदाने वस्तू वाटप केली.शिवण्याचे कौतुक होत आहे.तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे ही अभिनंदन व कौतुक होत आहे.

